Saturday, 15 June 2013

पांडुरंग सांगवीकर सम लैंगिक आहे का?

कलाकृति मधलि एखादि व्यक्तिरेखा आपली चौकट मोडुन वाचक अथवा प्रेक्षक यांच्या मनोव्यापाराचा हिस्सा बनते तेंव्हा ती कलाकृती यशस्वी होते असे म्हणायला हरकत नाही. शेरलॉक होम्स च बेकर स्ट्रीट वरील घर बघायला अनेक पर्यटक जायचे. मध्यंतरी हॅरी पॉटर या अती लोकप्रिय मालिकेमधले Dumbeldore हे पात्र कसे 'गे' आहे हे अहमहीकेने सांगणार्‍या लेखांचा वरवा पाडण्यात आला होता. उल्लेखनीय बाब अशी की दस्तुर्खुद लेखिका जे.के. रोलिंग बाई नि पण या थियरी ला दुजोरा देऊन एकच खळबळ उडवून दिली. या कपोकल्पित पात्राना मानवी गुणधर्म चिकटवने हा वाचकांचा / प्रेक्षकांचा अट्टहास असतो. मध्यंतरी विशाल भारद्वाज या दिग्दर्शकाचा 'कमिने' नावाचा एक अफलातून चित्रपट आला होता. त्यातले शाहीद कपूर ने रंगवलेले चार्ली नावाचे पात्र ( त्याच्या मित्रावर त्याचे मैत्री खात्यात खूप प्रेम असते) पण सम लैंगिक आहे का अशा अर्थाच्या चर्चा इंग्लीश मीडीया मधून झाडल्या होत्या.मराठी मनावर गारुड घालणारी एक कलाकृती म्हणजे 'कोसला' आणि प्रचंड लोकप्रिय पात्र म्हणजे पांडुरंग सांगवीकर. कोसला ला तुम्ही एक तर खूप शिव्या घालू शकता किंवा त्याचे प्रचंड गोडवे गाउ शकता. कोसला आणि पांडुरंग सांगवीकर कायम या द्वेष आणि प्रेमाच्या दोन ध्रुवानमध्ये वावरले. पांडुरंग सांगवीकर हा बंडखोर की अती सामान्य इसम, कोसला ही आयुष्याच्या निरर्थकतेची कहाणी की मनोरंजक कादांबरी या वर अनेक विवाद झाडले. यात मला माझा एक मुद्दा अजुन वाढवायचा आहे. पांडुरंग सांगवीकर हा सम लैंगिक आहे का?

पांडुरंग सांगवीकर ला मुलींची Allergy असते हे कोसला वाचताना वारंवार जाणवते. कॉलेज मध्ये असताना मुली दिसल्या की पांडुरंग आपला रस्ता बदलतो. सहली ला गेल्यावर मुली पासून दूर पळण्याला प्राधान्य देतो. प्रसंग कुठलाही असो आपण मूलीना शरण जात नाही असा सार्थ अभिमान त्याला असतो. नाही म्हणायला रमि नावाची एक मुलगी त्याच्या आयुष्यात येते. पण तिला असणार्‍या फुफ्फुस च्या विकारामुळे निव्वळ सहानुभूती पोटी पांडुरंग तिला बोलतो . एकूणच करमणूक म्हणून पण मुली वैतागच असे पांडुरंग चे मत.

जेंव्हा पांडुरंग सर्व सोडून कायमचा सांगवी ला येऊन राहतो तेंव्हा त्याचे लग्न ठरवण्याचे दांडगे प्रयत्न होतात. एक मुलगी तर त्यांच्या घरी पण येऊन राहते काही दिवस. पण पांडुरंग इथे पण मुलीनपासून दूर पळण्याचा आपला बाणा कायम ठेवतो. पण हे काही महत्वाच नाही. पांडुरंग आणि सुरेश तांबे यांच्यात जे काही आहे ते एकदमच थोर आहे. दोघांाही एकमेकाची सोबत जाम आवडते. दोघे ही एकत्र फिरायला जात असतात. सिंहगड, वेताळ टेकडी सगळीकडे. पांडू ला सुरेश तांबे बद्दल प्रचंड जिव्हाळा आहे. पण एक विचित्र खंत पण आहे. पांडुरंग च्याच शब्दात सांगायच तर : शेवटी दोघा पुरुषाना पाहिजे तितक जवळ जवळ येता येत नाही. एकमेकात शिरता येत नाही.  शरिराण सगळी गोची करून ठेवली आहे.

ना राहावून तू मुलगी असतास तर मी तुला सोडल नसत अशी स्पष्ट कबूली पांडुरंग सुरेश तांबे ला देतो. पण सुरेश कधी पांडुरंग च्या भावना समजूनच घेत नाही.  तो ही मैत्री आणि आकर्षण यातली सीमारेषा कायम पाळतो. पांडुरंग ला हे लागत. त्याच्याच शब्दात सांगायच तर : हेच. सुरेश च दुसर टोक. तो नेमक्यवेळी धो धो पाणी टाकून मोकळा. रिकामी स्थिती तो पुन्हा टाकतो. त्याला रिकामा अर्थ जेमतेम दुरून दिसला होता. काठावरून. बाकी स्वताहाला त्याने कधीच झोकून दिल नाही.

पांडुरंगाची ही सुरेश बद्दलची खंत बरेच काही सांगून जाते. पण नेमाडे यांच्या लिखाणात २ + २= ४ असे असेलच असे काही नाही. नेमाडे यांचे लिखाण ज्यानी वाचले आहे त्याना हे चांगलेच माहीत आहे.नेमाडे स्वताहा पुढे येऊन पांडुरंग च्या लैंगिकतेचा खुलासा करतील ही शक्यता सूतराम नाही. त्यामुळे पांडुरंग च्या लैंगिकतेची पण अनेक perceptions आणि versions  तयार होतील. पण चर्चा होणे हे नेहमीच चांगले. शेवटी चर्चा केल्याशिवाय तरणोपाय नाही. मग काय वाटत तुम्हाला? पांडुरंग सांगवीकर सम लैंगिक आहे?

No comments:

Post a Comment