Saturday, 2 November 2013

१९८० नंतर जन्मलेल्या पोरांचा सॉलिड लोचा

गरवारे कॉलेज मध्ये असताना आमचा एक छान ग्रूप जमला होता .बर्याच वर्षानी आम्हि काही दिवसापुर्वि एक मस्त गेट टुगेदर केल.  खाण -पिण  आणि गगन भेदी  गप्पा . सगळे साधारण  २८ ते ३० या वयोगटातले .या गप्पांमध्ये  मला आणि माझ्या एका मित्राला एक गोष्ट strike  झाली की  आमच्या गप्पांमध्ये  खूप वेळा  'आपल्या  वेळेस  अस नव्हत ' हे  वाक्य  अनेक  वेळेला  repeat  झाल  होत ……. आईला ! भर तिशीतच  आम्हाला  nostalgia आला कि काय ? मला  अस  वाटत  होत  की  हा  निवृत्त  झाल्यावर , सगळ्या  जबाबदाऱ्या  पार पाडून झाल्यावर  पोरटोर  मोठी  झाल्यावर येणारी  हि गोष्ट  असते . कुठेतरी  काहीतरी  चुकत आहे  खास.

म्हणजे  अस  पाहा . तेंडूलकर  निवृत्त  होत  आहे. फेडरर  उतरणीला  ला  लागला  आहे . रहमान  रहमानच  राहिला  आहे  का  असा  प्रश्न  पडला  आहे . बाळासाहेब  पण गेले. फेकू  आणि  पप्पू  शी  relate  होता  येत  नाही . तिशीतच  घर  घेतलि.  गाड्या  आल्या . परवाच  असाच  माझा  एक  मित्र मला  फोन  वर  उसासून  म्हणाला ," झाल  सगळ  करून . आता  पुढच्या  आयुष्यात  काय  करू  यार? whats  next ?" मुक्त  अर्थव्यवस्थेचा खंदा  समर्थक  असणारा  मी पण जागतिकीकरण च्या  या  बाय  प्रोडक्ट  मधून आलेल्या  प्रश्नाने  भोवंडून  गेलो . कमी  अधिक  फरकाने मी पण या complex  चा  शिकार  होतोच कि .

१९९१ नंतर  देशात  जे  वादळी  बदल सुरु  झाले त्यात अनेक जुन्या गोष्टी वाहून गेल्या. २००० नंतर या बदलांची गती अजूनच  वाढली. ८० च्या  दशकात जन्मलेली पिढी  हि त्या जुन्या काळाची पण साक्षीदार  आणि या भोवंडून टाकणाऱ्या काळाची पण वाटेकरी . एक उदाहरण द्यायचं झाल तर  आम्ही पोस्टाने टपाल पण पाठवली आहेत आणि आता तितक्याच सहजपणे इमेल संस्कृतीचे पण वाटसरू बनलो . आई वडिलांची सरकारी नौकरी च सुरक्षित आयुष्य पण जवळून बघितलं आणि आताच्या अति असुरक्षित नौकरया तर आम्हीच करत आहोत . आम्ही  शाळा  सुटल्यावर मैदानावर जाऊन उन्हातान्हात खूप खेळलो  आहोत आणि  video games पण जाम खेळलो आहोत. स्वतःच घर -आंगण ते बंदिस्त  flat संस्कृती हा प्रवास  पण  झरझर  झाला . त्या अर्थाने आमची पिढी हि 'transition ' मधली पिढी . जागतिकीकरणाचे सगळे  फायदे ओरपून घेतल्यावर त्याचे तोटे  नको  असणारी  पिढी . प्रचंड  भोवंडून टाकणाऱ्या  जगाप्रमाणे बदलताना आमची पिढी तिशीतच  थकून  गेली  आहे . ऐन  उमेदीतच आपल आता  पुढे काय  होणार या भीतीने  कोकरासारखी दबून गेली आहे .

कुणी  नोंद  घेतली  आहे कि नाही ते माहित नाही पण social  networking वर गेल्यावर कुणी या  पिढीतल्या लोकांची status बघितलीत तर जाणवेल की ती प्रचंड nostalgic  अस्तात. आपल्या शाळा-होस्टेल-कॉलोनी  चे group बनवून तिथे ती  लोक  (आम्ही ) ते  दिवस किती  भारी  होते आणि  आता  कस  सगळ बोर  होत चाललय  असल्या  चर्चा करत अस्तात. दोन  पूर्णपणे वेगळी जग पाहिल्याच्या धक्क्यातून हि  पिढी कधी बाहेर येईल असे वाटत नाहि.

आपली पिढी हि नशीबवान आहे आणि तिने खूप बघितले /सोसले आहे हा फेनोमेना जागतिक आणि सार्वकालिक आहेच. पण स्थानिक, जागतिक बदल पचवून  त्या बदलांचा भाग बनलेली पिढी हि एकमेवच . जागतिकीकरण  मधून एकाकी करणाकडे चालणारा  प्रवास या  ८० च्या  दशकात  जन्मलेल्या पिढी बरोबरच संपेल बहुदा .

प्रत्येक पिढीला काही समस्यांचा सामना करावा लागतो. आम्हाला  काही वेगळे करावे लागते असा  दावा नाही पण lets give davil his credit . खूप पाहिलं रे तुम्ही  पोरांनी लहान वयात असे कुणी मायेने तरी भरून पावल.

पण तरी  तोच माझ्या मित्राने विचारलेला प्रश्न दशांगुळे व्यापून उरतोच . Whats Next ? कुठेतरी  काहीतरी लोचा  आहे  खास. 

1 comment: