Saturday, 11 January 2014

अनैतिकता , संगीत दिग्दर्शक आणि Nostalgia चे उमाळे

मी  अशात  ऐकलेली  नवीन  वैचारींक  पिंक :

headphone  वर  गाणे  ऐकत  बसलो  होतो .

बाजुच्या  डेस्क  वरचे  काका ," काय  रे ? काय  ऐकत  आहेस ? "

"आतिफ  अस्लम ."

त्यांनी  माझ्याकडे  सहानुभूती पूर्वक  कटाक्ष  टाकला . त्याला  माझा  आक्षेप  नव्हता . पण    ते  जे  काही  बोलले  त्यामुळे  मी  पार  भंजाळून  गेलो . इतका  की  ते  वाक्य  पूर्ण  पणे  quote  करण्याचा  मोह  आवरत  नाही .

"तुमच्यासमोर  दुसरे  काही  चांगले  option  नाहीत  का  रे  ? हे  आजकालची  पोर  (संगीत  दिग्दर्शक ?) इंग्लिश  गाणी चोरतात  आणि  तुम्हाला  ऐकवतात . तुम्हाला पण  जे  काही  बाही  पाश्चमात्य  ते  सगळ  गोड  वाटत . आमची  पिढी  त्याबाबतीत  खूप  नशीबवान . काय  ते  दिग्गज  एकेक  संगीत  दिग्दर्शक  होते  त्याकाळी . ओपी , बर्मन  साहेब , सलिल  चौधरी . वा  वा ! देवाघरची  माणस  सगळी . त्यांनी  या  मातीतल  संगीत  दील . काय  त्या रसाळ  चाली . काय  ती melody !आणि  हे  सगळ  original बर  का. तुमच्या अनु मलिक  आणि  प्रीतम  सारख्या  चोऱ्या  नाही  केल्या  त्यांनी. "

असे  कुणी पिढीचे  हिशेब  द्यायला  लागले  की  टाळके  सरकते . भारतीय  चित्रपटा च्या  इतिहासात मला  रस  असल्याने  मी  त्यावर  थोड  फार  वाचन  केल  होत . त्यामुळे  मला  हे  माहित  होत  की भारतीय  चित्रपट  हा  plagiarism चा  इतिहास  अंगावर  भरजरी  दागिना  बाळगावा  त्याप्रमाणे  वागवतात . अगदी  सुरुवातीपासून . मग  च्यामारी  ह्या  ५०, ६०  आणि  ७० च्या  दशकातल्या  म्युझिक  directors   एकदम  कसे  काय गुणवत्तेची  खाण  निपजले  की  त्याकाळातले  लोक  आज पण  त्यांच्या  नावाने  उसासे  टाकत  असतात ? अशी  कशी  bollywood  रुपी चिखलात  हि  कमळ  उगवली ? दाल  मे  जरूर  कुछ  काला  है म्हणून  थोड  अधिक  संशोधन  केल . मग  कळल  की  पूर्ण  दालच काली  आहे .

म्हणजे  अस  बघा . आजा  सनम  मधुर चांदनी  मे हम  हे राज  कपूर च्या  चोरी  चोरी  मधल  शंकर -जयकिशन  च  मधुर  गाण एका  गाण्यावरून (http://www.youtube.com/watch?v=U-xsosv6uM0) सरळ  सरळ  ढापल  आहे  हे  कळाल्यावर  धक्का  नाही  बसणार ? दिल  तडप तडप के कह रहा  है आ भी  जा  हे  सलिल  चौधरी  च  रसाळ  गाण  सही सही  नक्कल  (http://www.youtube.com/watch?v=jLijXZBsdbo) आहे  हे  कळाल्यावर  धक्का नाही  बसणार . आर ड़ि  बर्मन  आणि  ओपी  ची  अख्खी कारकीर्द  चोरलेल्या इंग्लिश  गाण्याच्या पायावर  उभी  आहे  हे  कळल्यावर  भारतीय  म्हणून  वस्त्रहरण  झाल्याचा  फील  नाही  येणार  का ? आमच्या  पिढीच  एक  ठीक  आहे  हो पण 'सुवर्ण काळाच्या ' आठवणी काढून  उसासे  टाकणाऱ्या व  आजकालच्या  संगीताला  उठसुठ  नाव  ठेवणार्या बाजूच्या डेस्क वरच्या  काकासार्ख्या  लोकाना काय वाटेल ? ज्या  nostalgia  च्या  आपण  दिवसरात्र  ढेकरा  देतो  तोच  अनैतिक  पायावर  उभा  आहे  हे कळल तर पायाखालच जाजम काढून  घेतल्यासारख feeling नाही येणार  त्यांना ?

वस्तुस्थिती  हि  आहे  की  या  तथाकथित  'सुवर्ण कालामधली ' अनेक  गाणी  ही  त्याकाळच्या  हिट  इंग्रजी  गाण्यावरून चोरलेली होती . त्यासाठी  आपल्या गुणवान  संगीत  दिग्दर्शकांनी  मुळ  गाण्याची  मालकी  ज्यांच्याकडे  होती  त्यांच्याकडे परवानगी घेण्याची  तोशीस  पण  घेतली नाही  हे  तर  उघडच  आहे . दुसऱ्या  शब्दात सांगायचं  तर  हि  शुध्द  चोरी होती . या  चोरी  चे  अनेक  तपशील  तुम्हाला  इथे  सापडतील .
http://mrandmrs55.com/2012/08/24/plagiarism-in-hindi-film-music-is-imitation-the-most-sincere-form-of-flattery/

http://www.itwofs.com/hindi-opn.html

nostalgia  चे  उमाळे  काढणाऱ्या  लोकांचे आद्य  सरदार  जे  की  शिरीष  कणेकर  याना  याबाबत  कुणीतरी भर  कार्यक्रमात प्रश्न  विचारला . कणेकर काही  क्षण  नक्कीच  गडबडले  असतील पण  त्यांनी  जी  मखलाशी  केली  ती  मुळातून  वाचण्यासारखी  आहे . कणेकर  म्हणतात ," त्यांनी  गाणी  चोरली  हे  अमान्य  करण्यात  अर्थ  नाही पण  त्यांनी  या  गाण्याचं 'भारतीयकरण ' केल  आणि  त्यात  जी  melody  आणली  त्याच  श्रेय  या  संगीत  दिग्दर्शकाना  द्यायला  हव ." म्हणजे  चोरी  ते  चोरी  वर  सिनाजोरी ?

या  निमित्तान  काही  प्रश्न  उपस्थित  होतात .
१) अन्नु  मलिक , प्रीतम  , ओपी  आणि  बर्मन  पितापुत्र  हे  संगीत  शर्विलक  या  एकाच  श्रेणीतले  म्हणून गणले  जाणार का ?

२) आता  सगळाच  मामला चोरीचा  आहे  हे  कळल्यावर  तरी  nostalgia चे  उमाळे  थांबतील  का ?

३) ओपी  नय्यर  आणि  तत्सम  संगीत  दिग्दर्शक  चोर  आहेत  हे  कळल्यावर  त्यांच्या  भक्तांच्या  भावना  बदलणार  आहेत  का ?

मी  जमा  केलेला  संगीत  चोरीचा  डाटा  बाजूच्या  डेस्क  वर च्या  काकाना  मेल  करणार  होतो . पण  नाही  केला . ज्याचा  त्याचा  nostalgia . हल्ली मी माझ्या  डेस्कवर  आमच्या  रहमान  च्या  rockstar  ची  गाणी  फुल  आवाजात  ऐकतो .
No comments:

Post a Comment