Friday, 30 May 2014

अजित डोवाल : बस नाम हि काफी है

"It is not always easy. Your successes are unheralded--your failures are trumpeted."
President John F. Kennedy, CIA Headquarters, 28 November 1961

गुप्तहेर  खात  म्हंटल  की  मराठी  माणसाला  थेट  बहिर्जी  नाईक  आठवतो  आणि चाणक्याचे  कोटस  वैगेरे  आठवायला  लागतात . एरवी  गुप्तहेर  खात्याची  आठवण  आपल्याला  कुठे  बॉम्ब  स्फोट  झाला  की  खापर  फोडायला  आणि  शिव्या  घालायला  कुणीतरी  पाहिजे  तेंव्हा च  होते.  वर  केनेडी  ने  म्हणल्याप्रमाणे  यांच्या  यशोगाथा  कुणाला  कळत  नाहीत  मात्र  यांच्या  अपयशाचा  सार्वजनिक  पंचनामा  होतो.  अनेक  उदाहरण  अशी  आहेत  की  गुप्तहेर  खात्याच्या  सतर्कतेमुळे  अनेक बॉम्बस्फोट  आणि  अतिरेकी  हल्ले  टळले आहेत.  मात्र  सर्व  सामान्य  जनतेपुढे  हि  माहिती  फारशी  येत  नाहि.  पण  कुठे  बॉम्बस्फोट  झाले  की  प्रसारमाध्यम लगेच  आपल्या  गुप्तहेर  यंत्रणेतल्या  त्रुटिवरुन  आरडाओरड  सुरु  करतात . आणि  फुटबॉल  क्रमवारी  पासून  जागतिक  आरोग्या  निर्देशांकामध्ये  पाकिस्तान  शी  स्पर्धा  करण्याच्या  भारतीय  वृत्तीला,  "त्या  पाक्ड्यांची  ISI  बघा  कशी  हिरीरीने  काम  करते नाहीतर  आपली  RAW  बघा  बसलेत  हातावर  हात ठेवून " अस म्हणे  मानवते.  यातल्या  बहुतेक  लोकाना  RAW  चा  longform  पण  माहित  नसतो  मग  त्यांनी  १९७१ च्या  युद्धात  बजावलेली  जबरदस्त  कामगिरी  यांचा  पत्ता  असण्याची  सुतराम  शक्यता  नाहिच.  गुप्तहेर  खात्याबद्दल चे   हे  औदासिन्य  सर्वसामान्य  लोकांपासून  ते  राजकीय  नेत्यांपर्यंत  सर्वत्र  आढळते . 

अशा  या  देशात  अजित  डोवाल  सारख्या  खमक्या माजी  गुप्तहेर  अधिकाऱ्याची  मोदींचा राष्ट्रीय सुरक्षा  सल्लागार  म्हणून  नेमणूक  झाल्याच्या  बातमीला माध्यमांमध्ये  कुठेतरी  कोपरयात किंवा  मधल्या  पानावर जागां मिळाली  यात  आश्चर्य  ते  काय ? त्या बातम्यांमध्ये  पण  डोवाल  हे  अडवाणी  यांचे  निकटवर्तीय  असून  पण  मोदी  यांनी  त्यांची  नेमणूक  कशी  केली  असा  आश्चर्यमिश्रीत  खोचक  सुर  होता.  पण  सुदैवाने  अजित  डोवाल  ला  प्रसिध्द होण्यापेक्षा  त्याचे  काम  अचूक  करण्यात  जास्त  रस  आहे. त्याची  दीर्घ  कारकीर्द  तरी  हेच  सांगते . 

मी  डोवाल  बद्दल  पहिल्यांदा  वाचले  ते  हुसैन  झैदी  च्या  डोंगरी  ते  दुबई  या  दाउद  इब्राहिम  च्या  उदयावर  लिहिलेल्या  अप्रतिम  पुस्तकामध्ये .  भारतीय  गुप्तहेर  खात्याने  पाकिस्तान  मध्ये  दडुन  बसलेल्या  दाउद  ला उडवण्याचे  अनेक  प्रयत्न  केले आहेत . पण  एकदा  ते  त्याच्या  खुप  जवळ  पोहोंचले  होते . जावेद  मियांदाद  चा  मुलगा आणि  दाउद  च्या  मुलीच्या  लग्नाच्या  वेळेस . छोटा  राजन  या  दाउद  च्या  प्रतिस्पर्धी  टोळीशी  हातमिळवणी  करून  हा  बेत  आखण्यात  आला  होता . या  टोळीचे  दोन  उत्कृष्ट  नेमबाज फरीद तनाशा  आणि विकी  मल्होत्रा हे दुबई  (जिथे  विवाह  सोहळा  पार  पडणार  होता ) ला  पोहोंचले  पण  होते.सर्व  तपशील  ठरवला  होता . अगदी  बारीक  सारीक  गोष्टी  पण  पक्क्या  झाल्या  होत्या . म्हणजे  अगदी  हे  नेमबाज  कुठे  उभे  राहणार  आणि  गोळ्या  कधी  झाडणार  इथ्पर्यन्त. पण ……। कुठेतरी  माशी  शिंकली  आणि  अंतर्गत  गडबडीमुळे  हे  योजना  ऐन वेळेस  बारगळली . हातातोंडाशी  आलेला  घास  गेला.  हुसैन  झैदी  च्या  पुस्तकातले  हे  प्रकरणच  (प्रकरण २२- हेरांचे  संमेलन ) मुळातुन  वाचण्यासारखे  आहे.  तर  हे  सगळे  operation  अजित  डोवाल पार  पाडत  होता . ह्यानंतर  अजित  डोवाल  या  नावाबद्दल  कुतूहल  तयार  झाले  नसते  तरच नवल ,

कळस  म्हणजे  हा  अजित  डोवाल  चक्क  पाकिस्तानात  ७ वर्ष  राहून  हेरगिरी करून  राहून  आला  आहे . ते  पण  काहुटा  (पाकिस्तान  ची  पहिली आण्विक भट्टी जिथे  आहे ) अशा  ठिकाणी . त्यामुळेच  अजित  डोवाल  ला  पाकिस्तान  आणि ISI  याबद्दलचा  तज्ञ  म्हणून  ओळखले  जाते.  operation Blustar  च्या  काही  वेळ  अगोदर  हा  पठ्ठ्या  वेश  बदलुन  सुवर्ण  मंदिरात  जाऊन  राहिला  होता .  कारकीर्दीच्या  सुरुवातीलाच याने  २० वर्ष  खदखदणारा मिझोराम  प्रश्न  सोडवण्यात  सक्रिय  वाटा  उचलला  होता . अशा  असंख्य  देशाच्या  इतिहासाला  वळण  देणारया कामगिऱ्या पार  पाडणारा  हा  लढवय्या  कायमच  पडद्याआड  राहिला .  गुप्तहेर  खात्याबद्दल  प्रचंड  औदासिन्य  असणार्या देशात  या  योद्ध्याला  भारत रत्न  किंवा गेला  बाजार  पद्मश्री  मिळणे  तर  शक्य  नाही . पण  राष्ट्रीय  सुरक्षा  सल्लागार  या  पदावर  नेमणूक  झाल्याने  त्या  पदाचा  नक्कीच  सन्मान  झाला  आहे . अजित  डोवाल  चि  या  पदावर  नेमणूक  झाल्याने  दाउद , सलाउद्दीन  आदी  लोकांमध्ये  नक्कीच  धडकी  भरली  असेल . बाकीचे  माहित  नाही  पण  राष्ट्रीय  सुरक्षा  आणि  गुप्तहेर  खाते  या  आघाडीवर  नक्कीच  अच्छे  दिन  येण्याची  शक्यता  निर्माण  झाली  आहे.  स्वतहाचा जीव  देशासाठी  धोक्यात  घालणाऱ्या  या  unsung  hero ला  बहिर्जी  नाईकांच्या  महाराष्ट्रातुन  एक  मानाचा  मुजरा 


2 comments:

  1. अमोल सहज फिरत इथे पोहोचलो. लिहायची स्टाईल आवडली. मिपावरील धाग्यात पि्रतिसाद दिला होता.त्यावर प्रतिसाद अपेक्षित... शशिकांत ओक

    ReplyDelete
  2. Excellent,really many such heroes are unknown to the public but they work silently.

    ReplyDelete