Friday, 15 August 2014

One Night Stand आणि आपण सगळे

५ वर्षांपूर्वीची  गोष्ट . नवीन  नौकरी . Office चा  एक  इवेन्ट . पार्टी  एका  उच्चभ्रु  हॉटेल  मध्ये . मी  आणि  माझा  मित्र -कम -सहकारी  एकत्रच गेलो . पार्टी  एकदम  रंगात  आली  असतानाच  हा  एकदम  दिसेनासाच  झाला . मी  त्याला  फोन  केला . तर  त्याने  तो  उचललाच  नाही . थोड्या  वेळाने  त्याचा  मेसेज  आला  कि  त्याला  काही  अर्जंट  काम  निघाल्यामुळे  त्याला  एकदम  जावे  लागले . उद्या  ऑफिस  मध्ये  भेटूयात . असेल  काही  काम  म्हणून  मी  हि  फारस  लक्ष  दिल  नाही . दुसर्यादिवशी  हा  गडी  ऑफिस  मध्ये  एकदम  खुशीत . मी  त्याला  विचारले , "काय  रे  मित्रा , कुठे  गायबला  होतास  काल ?" तो  म्हणाला ," कुणाला  सांगणार  नसशील तर  सांगतो ." माझी  उत्सुकता  चाळवली . मित्र  पुढे  म्हणाला ," आपल्या  HR  मधली ती अबक  मुलगी  आहे  ना  तिच्यासोबत  माझ्या  flat  वर  गेलो  होतो . माझा  flatmate  सध्या  बाहेरगावी  आहे  आणि मी एकटाच  आहे ." मला  धक्का  बसला .

मी ," आयला  भारी  रे ! कधीपासून  चालू  आहे ? लग्न  वैगेरे  कधी  करताय  मग ?"

तर  तो ," वेडा  झालायस  का ? ते  तितक्या  पुरतच  होत . काही  serious  नाही  आहे ."

परभणी  सारख्या ठिकाणाहून  आलेल्या मला  सगळ्यात  पहिले  सांस्कृतिक  वैगेरे  म्हणतात  तसा  धक्का  बसला . आणि  नंतर  त्या  धक्क्याची  जागा  हेव्याने  घेतली .  One  Night  Stand  या  गोष्टीशी  आलेला  हा  माझा पहिला  संबंध .

आताशी  हा  लिंगो  बर्याच  वेळा  कानावर  पडतो . आणि  या  प्रकारच्या  गोष्टींमध्ये  मोठ्या  प्रमाणात  वाढ   झाली  आहे  हे  स्पष्टच  आहे . मला  स्वतहाला या  नातेसंबंधांच्या  कदाचित  सगळ्यात  छोट्या  फॉर्म बद्दल  कुतूहल  आहे . म्हणजे  योनिशुचीतेबद्दल  कुठलेही  वांझोटे  प्रोटेस्ट  माझ्या  मनात  नाहीत  पण  अशा  एखाद्या  नात्यात (?) आलेल्या  लोकांबद्दल कुतूहल  नक्कीच  आहे  . म्हणजे  असे पाहा  की  शारीरिक  आकर्षण  हाच  एखाद्या  नात्याचा  (मग  तो  किती  पण  short span  चा  असेल)  पाया  असू  शकतो  का ? का   मुळात  तमाम आपली  महान  भारतीय  संस्कृती वादी  म्हणतात  तस या  नात्यांना  काही   शेंडा  बुडखा  नसतो ? या  अशा  गोष्टींमुळे  आपल्या  महान  संस्कृती ला  धक्के  बसतात  का? आणि  सगळ्यात  महत्वाच  म्हणजे  भारतीय समाजमनात   sex  किंवा  इतर  कुठल्याही  अधिभौतिक  गोष्टीचा  मजा  घेण्याबद्दल  जो  प्रचंड  अपराधगंड  आहे त्यामुळे  one  Night Stand  सारख्या  गोष्टींमुळे  आपल्या  तकलादू  मुल्य  व्यवस्थेला
धक्के  बसतात  का  ?

माझ  निरीक्षण  अस  आहे  की  अनेक  ठिकाणासारखा  इथे  पण  इंडिया  आणि  भारत  असा  divide झाला  आहेच . एका  बाजूला  शहरांमध्ये  हा  phenomena वाढत  असताना  संस्कृती रक्षकाना  अर्थातच  हा  भारतीय  संस्कृती  वरचा  घाला  वाटत  आहे . समाजात  यामुळे  एक sexual  anarchy  येईल  अशी  भीती  त्यांना  वाटते. आपल्या  मुली  (नोट -मुलांची  त्याना  काळजी नाही ) बिघडतील  असे  पण  त्याना  वाटते .

बर हा  stand  कायम  दोन  अविवाहित  लोकांमध्ये  च  होईल  असे काही  नाही . अशी  काही  अट नाही .   म्हणजे  एखादा  विवाहित  पुरुष किंवा  स्त्री  एखाद्या  अविवाहित  पुरुष  किंवा  स्त्री  सोबत  पण  अनेकदा  रात्र  घालवू  शकतात . सिनिकस  असे  पण  म्हणू  शकतात  हा  विवाह  संस्थेच्या  मुळावरच  घाला  आहे . Where  is  the  sanctity  of  marriage ?  या  अवघड  प्रश्नांची  उत्तर  फार  गुंतागुंतीची  आणि  प्रत्येकापुरती  वेगवेगळी  आहेत . माझ्या अनुभवाच्या  कक्षेत  आलेल्या  लोकांची  जेवढी  अशी  प्रकरण  मी  पाहिली  आहेत  तेवढ्यावरून  मी  माझ्यापुरती  काही  उत्तर  बनवली  आहेत .

सर्वात  महत्वाच  म्हणजे  या  अशा  नात्यात  असलेल्या  एकमेका  कडून  असणार्या  शुन्य  अपेक्षा . हि  सर्वात  सुंदर  गोष्ट  आहे . न  कसले  राग , न  कसले  लोभ , ना  कसल्या  आणि  कुठल्या  तरी  insignificant  तारखा  लक्षात  ठेवण्याचे  ओझे . आपल्या  दोघाना  या  क्षणी  एकमेकांची  गरज  आहे . आपण  ती  पूर्ण करूया  आणि  लेट्स अपार्ट  ऑन  गुड  नोट . साध  आणि  सरळ . काही  लोकाना  हे  खूप  कोरड  वाटू  शकत  पण  पहिलेच  नमूद  केल्याप्रमाणे  to  each  his /her  own .

आणि  किती  लोक  अशी  संधी  समोर  आल्यावर  ती  सोडतील ? मग  ती  विवाहित  असो  वा  अविवाहित . याच  उत्तर  आपणच  आपल्या  मनाशी  ताडून  बघाव . नात्याचं  पावित्र्य , आपली  संस्कृती , कुणाला  कळल  तर, आणि  लोक  काय  म्हणतील  हे  प्रश्नांचे  ब्रम्ह  राक्षस  मानगुटीवरून  उतरवून . मला  वाटत  बहुतेक  लोकांच   उत्तर  नाही  असेच  असेल .

भानू  काळे  यांच्या  बदलता  भारत या  पुस्तकात  अतिशय  सुंदर  para  आहे  तो  quote  करण्याचा  मोह  आवरत  नाहीये . : आपला  देश  अंतर्विरोधानी  एवढा  भरलेला  आहे की  कुठल्याही  एका  चौकटीत  या  देशाचे  संपूर्ण  वास्तव  सामावले  जाणे अशक्य  वाटते .

इथल्या  विविधातेबद्दल असे  गमतीने  म्हणतात  की  या  देशाबाबत  केलेलं  कुठलेही  विधान  खरे  असू  शकते आणि  त्या  विधानाचा  व्यत्यास  हि  तेवढाच  खरा  असू  शकतो .

आम्ही  अणु  उर्जा  वापरतो  , तसेच  शेण  गोळे  हि  वापरतो .

इथे  धारावी  आहे  तसेच  मलबार  हिल  पण  आहे .

पाण्याचा  एकही  नळ  नसलेल्या  शाळा  आहेत  तसेच  स्विमिंग  पूल  असलेल्याही  आहेत .

हा  देश  गरीब  आहे  , हा  देश  संपन्नही  आहे .

भानू  काळे  यांचे हे  विधान  अजून  पुढे  न्यायचे  ठरवल्यास  या  देशात  आणि  समाजव्यवस्थेत  one night  stand ला  पण  जागा  आहे  आणि  विवाह  संस्थेला  पण  असे  म्हण्यास  हरकत  नसावी . भारतीय  व्यवस्थेने  पहिले  विरोध  करून  नंतर  विधवा  विवाह , संगणक  आणि  जागतिकीकरण  पचावलेच की .
कदाचित  काही  वर्षांनी  हे  मोठ्या  शहरांमध्ये  असणारे  लोण  छोट्या  शहरांमध्ये  आणि  ग्रामीण  भागात  पण  जाईल . त्याचा  वेग  कमी  जास्त  असू  शकतो .

लेखाच्या  सुरुवातीला ज्या  मित्राचा  उल्लेख  आहे  त्याची  परवा  फेस  बुक  वर  मैत्री  विनंती  आली . मी  लगेच  त्याची  friend लिस्ट  चाळून  बघितली . त्यात  "ती ' पण होती . दोघांची  पण  लग्न  झाली  होती . वेगवेगळ्या  लोकांसोबत .


Saturday, 2 August 2014

इतिहास मनमोहन सिंग यांचे मूल्यमापन कसे करेल ?

I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media, or for that matter, the Opposition parties in Parliament. - Manmohan Singh

नुकतच  मनमोहन  सिंग  यांचे  माजी  माध्यम  सल्लागार  संजय  बारू  लिखीत   'The Accidental Prime Minister' पुस्तक वाचून   झाल . बारू  हे  केवळ सिंग  यांचे  माध्यम  सल्लागार  नव्हते तर  ते  सिंग  यांच्या  अंतर्गत  वर्तुळातले  एक  महत्वपूर्ण  अधिकारी  होते . २००४ ते  २००९ या  काळात  सिंग  यांच्यासोबत  त्यांनी  खूप  जवळून  काम  केले  आहे . UPA-2 च्या  काळात   जेंव्हा  रोज  भ्रष्टाचाराचे  नवनवीन  सुरस  कथा  कानावर  यायच्या  तेंव्हा विरोधकांनी सिंग  यांची  तुलना आपल्या  मुलांच्या  दुष्कृत्याकडे  डोळेझाक  करणाऱ्या   धृतराष्ट्राशी  करायला  सुरुवात  केली . यापूर्वी  एकदा  यशवंत  सिन्हा  यांनी  सिंग  याना  शिखंडी  ची  उपमा  दिली  होती . पण  बारू  यांनी  या  आपल्या  एके  काळच्या  बॉस  ची  तुलना  भीष्म  या  व्यक्तिरेखेशी  केली  आहे .  चुकीच्या  पक्षात  असलेला एक  अत्यंत  प्रामाणिक  , विद्वान  माणूस . भीष्माच्या  आयुष्याची  जरी  शोकांतिका झाली  असली  तरी  ते  महानायक  होते . मनमोहन  सिंग  यांच्या बद्दल  असे  म्हणता  येईल का? .  स्वातंत्र्योत्तर  भारताच्या  इतिहासावर  ज्या  काही  थोड्या  लोकांनी  आपला  न पुसणारा  ठसा  उमटवला  आहे त्यात  सिंग  यांचे  नाव  नक्की  येईल . १९९१ मध्ये  देश  आर्थिक  गर्तेत  सापडला  असताना  नरसिंह राव  यांच्यासोबत  सिंग  यांनी  हा  आर्थिक  शकट  सांभाळला . इतकेच  नव्हे  तर  या  देशातल्या लाखो  तरुणांना  जागतिकीकरणाचे  फायदे  होतील  अशी  धोरण  राबवली . दुर्दैवाने  ज्या  लोकाना  या चे  सर्वाधिक  फायदे  झाले तेच  लोक  आज त्यांच्यावर  प्रच्छन्न  टीका  करताना  दिसतात . दुसऱ्या  महायुद्धात  अविस्मरणीय  विजय  मिळवून  दिल्यानंतर चर्चिल  यांनी  लोकांनी  सार्वत्रिक  निवडणुकीत घरी  बसवलं  होत . बर्यापैकी  सरकार  चालवून  पण वाजपेयी  यांच्यापेक्षा  सोनियांना  लोकांनी  २००४ मध्ये  पसंती  दिली  होति. लोकशाहीत   जन  मानसाचा  अंदाज  येणे  कठीणच . आणि त्यात  पण  भारतासारख्या खंडप्राय , बहुविध  , बहुभाषिक  देशात  तर  अजूनच  अवघड . 

मनमोहन यांच्या कारकीर्दीच्या  दोन  बाजू  आहेत  अस मला  वाटत . अर्थमंत्री  आणि   UPA-१ चे  पंतप्रधान  म्हणून एक  दैदिप्यमान  बाजू . आणि  भ्रष्टाचार , अकार्यक्षमताचे  आरोप   आणि  कळसूत्री  बाहूल  म्हणून  हेटाळणी  पदरात  पडलेली  UPA-2 कारकीर्द . एकदम  २ टोक . पण  जेंव्हा  विरोधक  मनमोहन  सिंग  यांचे  मूल्यमापन  करतात  तेंव्हा सरसकट  त्यांच्या  १० वर्ष पंतप्रधान  पदाच्या  कारकिर्दीला  मोडीत  काढतात .  पण  हे  खरे  आहे  का ? UPA-१ च्या काळात  विकासदर ९ % वर  पोहोंचला  होता . सरकार  साम्यवाद्यांच्या  पाठीम्ब्यांवर असताना  पण  अमेरिकेसोबत अणुकरार  करताना सिंग  यांनी  राजकीय  धाडस  दाखवून  त्याना  फाट्यावर  मारल .( देशात  तो  पर्यंत  काही  भागात  का  होईना साम्यवाद्यांचे वर्चस्व  होते  त्याला  ओहोटी  लागण्याची  प्रक्रिया  तिथून  सुरु  झाली  असे  माझे  निरीक्षण . चूभू  द्या  घ्या . या  पतनाची  सुरुवात  करण्याचेश्रेय  सिंग  यांना  द्यावे  का ? )

२००९ मध्ये  कॉंग्रेस  ने  जो  विजय  मिळवला  आणि  स्वतःच्या  जागा  मध्ये  भर  घातली  त्याचे  श्रेय  बारू  पूर्णपणे  मनमोहन  यांना  देतात . यासंबंधी चे  एक  छान  उदाहरण  त्यांनी  पुस्तकात  दिले  आहे . 'द  हिंदू ' या  दैनिकाच्या  विद्या सुब्रमन्यम  यांनी  ग्रामीण  तसेच  मुस्लिम  जनतेला  प्रश्न  केला  होता . तुमच  मत  कुणाला ? त्यावर  त्यांनी  एकमुखाने उत्तर  दिले  होते . ' सरदार  को '. ते  सर्व  जण  सिंग  याना  नेक  आदमी  संबोधत  असतो . सत्तेवर  असलेले  पंतप्रधान  आपली  पाच  वर्षाची  मुदत  पूर्ण  करतात  आणि  नंतर  बहुमताने  निवडून  येतात  असे  १९६२ नंतर  पहिल्यांदाच  घडले  होते .  विरोधक  कायम  सिंग  यांच्यावर  उत्तम  अर्थ  तज्ञ  पण  वाईट  राजकारणी  म्हणून  टीका  करायचे . पण  नंतर  दिग्विजय  सिंग  म्हणाले  तसे  सिंग  यांच्यातल्या  चलाख  राजकारण्याकडे  सगळ्यांनीच  दुर्लक्ष  केले . सिंग  हे  राजकारण  करण्यात  पारंगत  होते  हे  अमान्य  करण्यात  काही  अर्थ नाही . १० वर्ष  पक्षांतर्गत  विरोधक , सत्ताबाह्य  केंद्र , विरोधक  यांना  तोंड  देऊन  सरकार  चालवणे  काही  खायचे काम  आहे  का ?

बाह्य  सत्ताकेंद्र  हि  भारतीय  राजकारणाची  खासियत  बनत  चालली  आहे  का ? गोविन्दाचार्यानी  वाजपेयी  यांना  'मुखवटा ' म्हणून  संबोधले  होते . सिंग  यांच्या  पंतप्रधान  पदाची  कारकीर्द  सोनिया  यांच्या  सावली  खाली  गेली  हे  नाकारण्यात  अर्थ  नाही . अनेक  धोरण  निव्वळ  पक्ष  संघटनेच्या  (पक्षी -सोनिया ) आग्रहामुळे  राबवावी  लागली . सोनिया  वरचा  स्वयंसेवी  संस्थांचा  प्रभाव  बहुश्रुत  आहे .   मंत्री  मंडळातले  अनेक  ज्येष्ठ  सदस्य प्रणव  मुखर्जी , अर्जुन  सिंग  हे  आपले  reporting  थेट  सोनियांना  करायचे . अनेक  लोकांच्या  मते  राहुल  गांधी  यांनी  जेंव्हा  राजकारणाच्या  गुन्हेगारीचे  विधेयक  'nonsense' म्हणून फाडून  फेकला  होते  तेंव्हा  तरी आत्म सम्मान  दाखवून  सिंग  यांनी  राजीनामा  द्याला  पाहिजे  होता . पण  सिंग  यांनी त्यावेळेस  आपल्या  पदाला   चिकटून  राहणेच  पसंद  केले 

२००९ नंतर  आणि  नुकत्याच  झालेल्या  सार्वत्रिक  निवडणुकीच्या  काळात  मनमोहन  सिंग  यांच्यावर  अतिशय  खालच्या  पातळीवर  हल्ले  झाले . सरकार  ची  धोरण , भ्रष्टाचार  , अकार्यक्षमता यांच्यावर  होणारी  टीका  हि  बर्याच  अंशी  स्वाभाविक  असली  तरी त्यानिम्मिताने  मोठ्या  लोकांवर अतिशय  घाणेरडी  वैयक्तिक  टीका करण्याचा  ट्रेंड  भारतीय  राजकारणात  रुजला हि  खरी  घातक  बाब . म्हणजे  सिंग  हे  एका  'बाई ' चे  ऐकतात  म्हणून  त्यांच्यावर टीका  करणारे  लोक  मी  पाहिले  आहेत . त्यांना सत्ताबाह्य  केंद्र  हा  मुद्दा  महत्वाचा  वाटत  नसून  एक  पुरुषासारखा  पुरुष  एका  बाई  चे  कसे  मुकाटपणे  ऐकतो  हा मुद्दा महत्वाचा वाटायचा . सर्वात  धक्कादायक  म्हणजे  काही  स्त्रिया  पण  हा  मुद्दा  हिरीरीने  मांडायच्या . मनमोहन  सिंग  आणि  सोनियांची  आक्षेपार्ह  morphed  photograph  सगळ्यांनीच  पाहिली  आहेत . इतिहासातले  स्थान  वैगेरे  राहूच  दे  पण  या  देशाच्या  अर्थकारणाला  कायमचे  वेगळे  वळण  देणाऱ्या  सिंग   यांचा  सरसकट एकेरी आणि मन्नू  वैगेरे  उल्लेख  करणे  कितपत  योग्य  आहे . 

देशातील  बहुतांश  जनसमुदाय  हा  फारवेळ  कुठल्याच  लाटेखाली  राहत  नाही . कदाचित  अजून  काही  वर्षांनी  नकारात्मकते चे  ढग  विरून सिंग  यांचे वास्तविक  मूल्यमापन हा  देश  करेल  हि  अपेक्षा . इतिहास  च  माझे  खरे  मूल्यमापन करेल  असे  विधान  करण्यामागे  हाच  मनमोहन  सिंग  यांचा  उद्देश  असेल  कदाचित .