Friday, 15 August 2014

One Night Stand आणि आपण सगळे

५ वर्षांपूर्वीची  गोष्ट . नवीन  नौकरी . Office चा  एक  इवेन्ट . पार्टी  एका  उच्चभ्रु  हॉटेल  मध्ये . मी  आणि  माझा  मित्र -कम -सहकारी  एकत्रच गेलो . पार्टी  एकदम  रंगात  आली  असतानाच  हा  एकदम  दिसेनासाच  झाला . मी  त्याला  फोन  केला . तर  त्याने  तो  उचललाच  नाही . थोड्या  वेळाने  त्याचा  मेसेज  आला  कि  त्याला  काही  अर्जंट  काम  निघाल्यामुळे  त्याला  एकदम  जावे  लागले . उद्या  ऑफिस  मध्ये  भेटूयात . असेल  काही  काम  म्हणून  मी  हि  फारस  लक्ष  दिल  नाही . दुसर्यादिवशी  हा  गडी  ऑफिस  मध्ये  एकदम  खुशीत . मी  त्याला  विचारले , "काय  रे  मित्रा , कुठे  गायबला  होतास  काल ?" तो  म्हणाला ," कुणाला  सांगणार  नसशील तर  सांगतो ." माझी  उत्सुकता  चाळवली . मित्र  पुढे  म्हणाला ," आपल्या  HR  मधली ती अबक  मुलगी  आहे  ना  तिच्यासोबत  माझ्या  flat  वर  गेलो  होतो . माझा  flatmate  सध्या  बाहेरगावी  आहे  आणि मी एकटाच  आहे ." मला  धक्का  बसला .

मी ," आयला  भारी  रे ! कधीपासून  चालू  आहे ? लग्न  वैगेरे  कधी  करताय  मग ?"

तर  तो ," वेडा  झालायस  का ? ते  तितक्या  पुरतच  होत . काही  serious  नाही  आहे ."

परभणी  सारख्या ठिकाणाहून  आलेल्या मला  सगळ्यात  पहिले  सांस्कृतिक  वैगेरे  म्हणतात  तसा  धक्का  बसला . आणि  नंतर  त्या  धक्क्याची  जागा  हेव्याने  घेतली .  One  Night  Stand  या  गोष्टीशी  आलेला  हा  माझा पहिला  संबंध .

आताशी  हा  लिंगो  बर्याच  वेळा  कानावर  पडतो . आणि  या  प्रकारच्या  गोष्टींमध्ये  मोठ्या  प्रमाणात  वाढ   झाली  आहे  हे  स्पष्टच  आहे . मला  स्वतहाला या  नातेसंबंधांच्या  कदाचित  सगळ्यात  छोट्या  फॉर्म बद्दल  कुतूहल  आहे . म्हणजे  योनिशुचीतेबद्दल  कुठलेही  वांझोटे  प्रोटेस्ट  माझ्या  मनात  नाहीत  पण  अशा  एखाद्या  नात्यात (?) आलेल्या  लोकांबद्दल कुतूहल  नक्कीच  आहे  . म्हणजे  असे पाहा  की  शारीरिक  आकर्षण  हाच  एखाद्या  नात्याचा  (मग  तो  किती  पण  short span  चा  असेल)  पाया  असू  शकतो  का ? का   मुळात  तमाम आपली  महान  भारतीय  संस्कृती वादी  म्हणतात  तस या  नात्यांना  काही   शेंडा  बुडखा  नसतो ? या  अशा  गोष्टींमुळे  आपल्या  महान  संस्कृती ला  धक्के  बसतात  का? आणि  सगळ्यात  महत्वाच  म्हणजे  भारतीय समाजमनात   sex  किंवा  इतर  कुठल्याही  अधिभौतिक  गोष्टीचा  मजा  घेण्याबद्दल  जो  प्रचंड  अपराधगंड  आहे त्यामुळे  one  Night Stand  सारख्या  गोष्टींमुळे  आपल्या  तकलादू  मुल्य  व्यवस्थेला
धक्के  बसतात  का  ?

माझ  निरीक्षण  अस  आहे  की  अनेक  ठिकाणासारखा  इथे  पण  इंडिया  आणि  भारत  असा  divide झाला  आहेच . एका  बाजूला  शहरांमध्ये  हा  phenomena वाढत  असताना  संस्कृती रक्षकाना  अर्थातच  हा  भारतीय  संस्कृती  वरचा  घाला  वाटत  आहे . समाजात  यामुळे  एक sexual  anarchy  येईल  अशी  भीती  त्यांना  वाटते. आपल्या  मुली  (नोट -मुलांची  त्याना  काळजी नाही ) बिघडतील  असे  पण  त्याना  वाटते .

बर हा  stand  कायम  दोन  अविवाहित  लोकांमध्ये  च  होईल  असे काही  नाही . अशी  काही  अट नाही .   म्हणजे  एखादा  विवाहित  पुरुष किंवा  स्त्री  एखाद्या  अविवाहित  पुरुष  किंवा  स्त्री  सोबत  पण  अनेकदा  रात्र  घालवू  शकतात . सिनिकस  असे  पण  म्हणू  शकतात  हा  विवाह  संस्थेच्या  मुळावरच  घाला  आहे . Where  is  the  sanctity  of  marriage ?  या  अवघड  प्रश्नांची  उत्तर  फार  गुंतागुंतीची  आणि  प्रत्येकापुरती  वेगवेगळी  आहेत . माझ्या अनुभवाच्या  कक्षेत  आलेल्या  लोकांची  जेवढी  अशी  प्रकरण  मी  पाहिली  आहेत  तेवढ्यावरून  मी  माझ्यापुरती  काही  उत्तर  बनवली  आहेत .

सर्वात  महत्वाच  म्हणजे  या  अशा  नात्यात  असलेल्या  एकमेका  कडून  असणार्या  शुन्य  अपेक्षा . हि  सर्वात  सुंदर  गोष्ट  आहे . न  कसले  राग , न  कसले  लोभ , ना  कसल्या  आणि  कुठल्या  तरी  insignificant  तारखा  लक्षात  ठेवण्याचे  ओझे . आपल्या  दोघाना  या  क्षणी  एकमेकांची  गरज  आहे . आपण  ती  पूर्ण करूया  आणि  लेट्स अपार्ट  ऑन  गुड  नोट . साध  आणि  सरळ . काही  लोकाना  हे  खूप  कोरड  वाटू  शकत  पण  पहिलेच  नमूद  केल्याप्रमाणे  to  each  his /her  own .

आणि  किती  लोक  अशी  संधी  समोर  आल्यावर  ती  सोडतील ? मग  ती  विवाहित  असो  वा  अविवाहित . याच  उत्तर  आपणच  आपल्या  मनाशी  ताडून  बघाव . नात्याचं  पावित्र्य , आपली  संस्कृती , कुणाला  कळल  तर, आणि  लोक  काय  म्हणतील  हे  प्रश्नांचे  ब्रम्ह  राक्षस  मानगुटीवरून  उतरवून . मला  वाटत  बहुतेक  लोकांच   उत्तर  नाही  असेच  असेल .

भानू  काळे  यांच्या  बदलता  भारत या  पुस्तकात  अतिशय  सुंदर  para  आहे  तो  quote  करण्याचा  मोह  आवरत  नाहीये . : आपला  देश  अंतर्विरोधानी  एवढा  भरलेला  आहे की  कुठल्याही  एका  चौकटीत  या  देशाचे  संपूर्ण  वास्तव  सामावले  जाणे अशक्य  वाटते .

इथल्या  विविधातेबद्दल असे  गमतीने  म्हणतात  की  या  देशाबाबत  केलेलं  कुठलेही  विधान  खरे  असू  शकते आणि  त्या  विधानाचा  व्यत्यास  हि  तेवढाच  खरा  असू  शकतो .

आम्ही  अणु  उर्जा  वापरतो  , तसेच  शेण  गोळे  हि  वापरतो .

इथे  धारावी  आहे  तसेच  मलबार  हिल  पण  आहे .

पाण्याचा  एकही  नळ  नसलेल्या  शाळा  आहेत  तसेच  स्विमिंग  पूल  असलेल्याही  आहेत .

हा  देश  गरीब  आहे  , हा  देश  संपन्नही  आहे .

भानू  काळे  यांचे हे  विधान  अजून  पुढे  न्यायचे  ठरवल्यास  या  देशात  आणि  समाजव्यवस्थेत  one night  stand ला  पण  जागा  आहे  आणि  विवाह  संस्थेला  पण  असे  म्हण्यास  हरकत  नसावी . भारतीय  व्यवस्थेने  पहिले  विरोध  करून  नंतर  विधवा  विवाह , संगणक  आणि  जागतिकीकरण  पचावलेच की .
कदाचित  काही  वर्षांनी  हे  मोठ्या  शहरांमध्ये  असणारे  लोण  छोट्या  शहरांमध्ये  आणि  ग्रामीण  भागात  पण  जाईल . त्याचा  वेग  कमी  जास्त  असू  शकतो .

लेखाच्या  सुरुवातीला ज्या  मित्राचा  उल्लेख  आहे  त्याची  परवा  फेस  बुक  वर  मैत्री  विनंती  आली . मी  लगेच  त्याची  friend लिस्ट  चाळून  बघितली . त्यात  "ती ' पण होती . दोघांची  पण  लग्न  झाली  होती . वेगवेगळ्या  लोकांसोबत .


No comments:

Post a Comment