Monday, 22 September 2014

परिपूर्ण एकटेपणा


जी ए  कुलकर्णी  यांच्याबद्दल  आणि  त्यांच्या एकांतप्रियतेबद्दल   बद्दल  अनेक  कथा  ऐकल्या  आहेत . मुंबई  पुणे सारखी  जागा  सोडून  त्यांनी  धारवाड  या  छोट्या  जागी  राहणे  पसंद  केले . त्याना  भेटायला  अनेक  लोक राज्याच्या  कानाकोपर्यातून  यायची . त्यांना  ते  फारस  आवडायचं  नाही . म्हणून  ते  बाजूला  खेळणाऱ्या  मुलाला  बोलावून  त्याला  घराला  बाहेरून  कुलूप  लावायला  सांगत  आणि  स्वतहा  आत  बसून  राहत . एका  creative  genius ची  फ़क़्त  एक  लहर  म्हणून  त्याकडे  बघतात का ? मुळात  तुमचा  हक्काचा  एकांत  मिळवण्यासाठी  तुम्हाला  जी ए  सारख  creative  genius  असणेच  आवश्यक  आहे  का ? अनेकदा  १० ते  ५ नौकरी  करणाऱ्या  तुमच्या  माझ्यासारख्या  लोकांची  पण  ती  गरज  असतेच  की . हि  गरज  दाबून  बहुतेक  लोक  जगतात .  


मी  एका  nuclease मध्यमवर्गीय  कुटुंबातल  अपत्य . एकुलता  एक  मुलगा . आई  बाबा  दोघेही नौकरीला  . त्यामुळे  मला  लहानपणा  पासूनच  एकटे  राहावे  लागले . पण  माझ  आणि  एकटे  पणाच  भन्नाट  जुळून  आल . एकटे  पणा  आणि  त्यातून  येणार  स्वातंत्र्य  मला  जाम  आवडल . नंतर  नंतर  तर  मला  आजू बाजूच्या  गर्दीचा  जाचच  होऊ  लागला . शाळेतून  पटकन  घरी  पटकन  कधी  येतो  अस  मला  व्हयाच . फ़क़्त  गणित  आणि  विज्ञान  मध्ये  चांगले  मार्क  येणे  म्हणजे  हुशार  अश्या  भंपक  कल्पना  असणाऱ्या  शाळेत  असाही  जीव  घुसमट  करायचा . नंतर  शिक्षणासाठी बाहेर  गावी  आल्यावर  मी  होस्टेल  मध्ये  राहायला  लागलो . पण  एका  रूम  ची  एवढी  छोटी  जागा  ३ लोकांनी  शेयर  करायची  हि  कल्पना  मला  रानटी  वाटली .  म्हणजे  तुम्ही  कधीही  काहीही  करत  असलात  तर  किमान  चार  डोळे  , दोन  खिडक्या  आणि  एक  दरवाजा  ते  बघत  असतो हे  मला  तरी  inhuman  वाटायचं . मुंबई  मधल्या  लोकल  प्रवासासारख . होस्टेल  मध्ये  बरीच  धमाल  केली  असली  तरी  मी  माझी  स्पेस  कायम  मिस  करायचो . जेंव्हा  मला  पहिला  जॉब  मिळाला  तेंव्हा  मी  लगेच  flat  भाड्याने  घेतला . आणि  तिथे  एक  टीवी . माझ्या पगाराचा  निम्म्याहून   जास्त  हिस्सा  भाड  देण्यात  जायचा पण  प्रत्येकाला  आपली  स्पेस  घेण्याची  किंमत  चुकवावी  लागते .

आतापर्यंत  माणुसघाणा  म्हणून  माझी  बर्यापैकी  बदनामी  झाली  होती . नातेवाईक  'तू  आमच्याकडे  येतच  नाहीस ' म्हणून  माझ्या  नावाने  ओरडायचे . पण  सगळ्या  नातेवाईक  नि  जमून  काही  धार्मिक  विधी  करायचे , एकमेकांची  package  विचारायची , कुणाची  एकाची  ठरवून  क्रूर  पणे  खेचायची आणि  इतर  बर्याच  निरर्थक  गोष्टी  फ़क़्त पिढ्यान  पिढ्या  चालू  आहेत  म्हणून  करायच्या या  गोष्टीं  मध्ये  मला  रस  नव्हता . म्हणजे  मी  एकटा  असताना  काही  भव्य  दिव्य  करायचो  अशातला  भाग  नाही पण  मला  माझी  पुस्तक , माझा  टीवी , आणि  माझा  परिपूर्ण  एकटे  पणा   जास्त  आवडायचा .  आम्ही  मित्र  ट्रीप  ला  गेलो  कि  २ दिवस  तरी  घरापासून  दूर  राहायचो . तेंव्हा  पण  मित्रांसोबत  धमाल  करून  झाली  की  मी  एक  तास  तरी  beach  वर  माझ  एकटेपणा शोधण्यासाठी  निघून  जायचो .

लग्नानंतर  माझ्या  या  मनमुराद  एकटेपणावर  गदा  आली . तेंव्हा  पण माझी  बायको  आणि  मी  बसलो  असताना  मध्येच  laptop  उचलून  मधल्या  खोलीत  निघून  जायचो . बायको  च्या  चेहऱ्यावरचे  हिरमुसलेले भाव  अजून  पण  कधी  कधी  मला  guilt  देतात . नंतर  नंतर  या  एकटे  पणा  पायी  मी  माझ्या  जवळच्या  मित्राना  अतिशय  क्रूर  पणे  कटवायला  लागलो . आणि  माझी  मला  च  या  अतिरेकाची  जाणीव  झाली . आणि  मी  माझ्यात  थोडे  बदल  केले . पण  ते  फ़क़्त  जवळच्या  लोकांसाठीच .

आपल्या  समाजात  एकटे  राहण्याबद्दल  आणि  हक्काने  स्वतःची  स्पेस  घेण्यार्या  लोकांबद्दल  काही  जबरी  गैरसमज  आहेत . म्हणजे  एखादा माणूस  एकटा  राहात  असेल  तर  आजू  बाजू  च्या  लोकाना  ह्याच्या  आयुष्यात  काही  तरी  tragedy  असेल  असा  समज  होतो . म्हणजे एकट  राहणे  हे  by choice असूच  शकत नाही   अस  काही  वाटत  असेल  काय ? स्वतःच्या  स्पेस  बद्दल  भारतीय  समाजा  इतका  उदासीन  समाज  दुसरा  नसेल . आपल्या  लोकाना  कायम  उत्सवप्रिय , गलबल्यात  राहाण्याच  brainwashing  झाल  असत  कि  काय  असा  प्रश्न  पडतो . म्हणजे  खूप  लोक  परिस्थितीमुळे (आर्थिक  आणि  सामाजिक )  स्वतःची  स्पेस  नाही घेऊ  शकत  हे  मान्य  पण  ज्याना  शक्य  आहे  ते  पण आपली  मुलभूत  गरज  पूर्ण  करण्यासाठी  प्रयत्न  करतात  का  हा  प्रश्न  आहे . आपण  एकटे  झालो  म्हणजे  समाजाच्या  सुरक्षा  चक्राबाहेर  आलो . आपण  लोकाना  भेटायला  नाही  गेलो  तर  आपल्याला  प्रसंगात  कुणी  येणार  नाही  या  भावनेने  अनेक  लोक  आपली  स्पेस  नाकारून  पुन्हा  लोकांच्या  घाण्यात  इच्छा  नसताना  घुसतात  (वैयक्तिक  sample  survey  मधून  काढलेला  निष्कर्ष : त्यामुळे  बरोबर  असेलच  याची  खात्री  नाही ) एकटे  राहणे  ज्या  समाजाच्या  चौकटीत  बसत  नाही  तिथे  आपण  misfit  आहोत  हि  भावना  कधी  कधी  बळावते . सतत  स्वतःची  स्पेस  नाकारण्याचे  काही  वैयक्तिक  / सामाजिक  परिणाम  होऊ  शकतात  का ?  आपल्या  समाजात  स्वतःची  स्पेस  घेणाऱ्या  लोकांवर  ठप्पे  मारणे  समाज  थांबवेल  का ?
समाज  नावाच्या  जनावराशी  मुकाबला  करणे  मुळातच  अवघड . झु  मधल्या  प्राण्यांसारखे  compartment करून  श्रेण्या  देणाऱ्या  समाजात  तर  ते  अजूनच  अवघड .

 मुळात  स्पेस  ची  प्रत्येकाची  व्याख्या  वेगळी  असते . वयाच्या  तिसाव्या  वर्षी  माझी  स्वतःची  एक  व्याख्या  आहे  ( ३ वर्षापूर्वी  ती  drastically  वेगळी  होती ) माझी  व्याख्या  विचाराल  तर  एक   आळशी  दिवस . कुठेही  जायचे  नाही . कुणीही  येणार  नाही . फ्रीज  मध्ये  २ बियर  आहेत . घरात  कुणी  हि  नाही . अगदी  बायको  पण  नाही . टीवी  चालू  आहे . नेट  पण एकदम  फास्ट  चालू  आहे .  वेळ दाखवणाऱ्या  सगळ्याच  साधनांमध्ये  काहीतरी  बिघाड  झाला  आहे . आणि  मनमुराद  एकटेपणा  प्यायचा  आहे . कुणीही तुम्हाला  जज  करत  नाहीये  आणि  तुम्हाला  कोणी  जज  करत  नाहीये . मस्त  पैकी  कुठला  तरी  nostalgia  आहे  सोबतीला . बस्स . अजून  काय  पाहिजे . 
2 comments:

  1. "परि जागा चुकलासी", असं सुचवावसं वाटतंय. मला वाटतं पश्चिमेच्या देशात आपला जीव जास्त रमेल…

    ReplyDelete
  2. हा हा हा . जागा चुकली हे तर खरच आहे : )

    ReplyDelete