Saturday, 15 November 2014

राजकारण्यांची वैयक्तिक आयुष्य आणि भारतीय जनमानस

अशात  बघण्यात  आणि  वाचण्यात  आलेले  दोन  प्रसंग -  लोकसभा  निवडणुकीच्या  प्रचाराची  रणधुमाळी  चालू  असताना  वर्तमान  पत्रात  कुणी राजकुमारी  कौल  वारल्याची  बातमी  वाचण्यात  आली . त्यांच्या  अंतिम  संस्काराला  अरुण  जेटली , ज्योतिरादित्य  शिंदे  आणि  इतर  बरेच  दिग्गज  उपस्थित  होते .   कोण  होत्या  या  राजकुमारी  कौल ? वाचून  अनेकाना  धक्का  बसेल  पण  दिल्ली  च्या  राजकारणी  वर्तुळात  त्या  अटलबिहारी  वाजपेयी  यांच्या  'Constant  Companion  ' म्हणून  प्रसिद्ध  होत्या  .  वाजपेयी  यांच्यासोबत  एका  घरात  त्या  अनेक  वर्षांपासून  राहात  होत्या .ज्या  दिवशी  कौल वारल्या  त्यादिवशी  सोनिया गांधी  वाजपेयी  यांच  सांत्वन  करायला  त्याना  भेटल्या . मनमोहन  सिंग  यांनी  पण   दूरध्वनी  वरून  संपर्क  साधला .  नंतर  बदनाम  झालेले  वाजपेयी  यांचे  'मानलेले'  जावई  रंजन  भट्टाचार्य  हे  कौल  यांच्या  मुलीचे  श्रीमान . Indian  Express  ने  'Mrs Kaul, Delhi’s most famous unknown other half, passes away' असा  मथळा  देऊन  हि  बातमी  छापली . वाजपेयी  यांनी 'मै  कुंवारा  हु ,   ब्रम्हचारी  नही ' असे  विधान  केले  होते  तरी  हे  संबंध कायम  सर्व  सामान्य  लोकांसाठी   'under  the  wraps ' होते  किंबहुना  जाणून  बुजून  ठेवण्यात  आले होते . अटलजी  ची  सर्वसामान्य लोकांमध्ये  जी  प्रतिमा  होती  ती  ढासळू  न  देण्यासाठी  हा  खटाटोप  होता .

दुसरा  प्रसंग - १४ नोव्हे . ला  पंडित  जवाहरलाल  नेहरू यांचा वाढदिवस  बालदिन  म्हणून साजरा  केला  जातो . पण  त्यादिवशी  'कुजबुज  ब्रिगेड ' च्या  लोकांनी  फेसबुक  वर  नेहरूंचे  सिगरेट  शिल्गाव्णारे , मद्याचा  चषक  हातात  असणारे , महिलांसोबत  जवळीक  दाखवणारे  (त्यातले  बरेचसे  Photo  Shopped ) फोटो पसरवायला  सुरुवात  केली . उद्देश  अर्थात  नेहरू  कसे  बदफैली  होते  हे  सिद्ध  करण्याचा  होता  हे  उघड  होते . पण  लेखाचा  मुख्य  मुद्दा  हा  नाही .  नेहरूंचे  सिगारेट  पितानाचे फोटो  टाकणारे  अनेक  परिचित  स्वतः  सिगारेट  ओढतात . नेहरूंचे  स्त्रियांसोबत  फोटो  टाकणारे  अनेकजण  स्त्रियांबद्दल  काय  'नजरिया ' बाळगतात  हे  पण  माहित  होत . पण  त्यांची  अपेक्षा  नेहरू  हे  आपले  पंतप्रधान  होते  म्हणून  त्यांनी  काही  गोष्टी  करू  नये  अशी  बालिश  होती .

राजकारणी  हि  पण  माणस  असतात  आणि  सर्वसामान्य  लोकांसारखी  स्खलनशील  असतात  हे  भारतीय जनमानस  का  मान्य  करत  नाही  ?    धुम्रपान  व मद्यपान  ह्या  जगातले  अनेक  लोक  सहज  करत  असणारया  गोष्टी  पण  राजकारण्याना   चार  चौघात  करण्याची  मुभा  नसावी ? काही  दिवसांपूर्वी  प्रफुल पटेल   यांचा  एका  पार्टी  मध्ये  हातात  कॉकटेल  चा  ग्लास  असणारा  फोटो  आल्यावर  एका  प्रतिष्ठित  वृत्तपत्राने  त्यावर  गहजब  केला  होता .  म्हणजे  वाजपेयी  यांनी  आजन्म  ब्रम्हचारी  राहील  पाहिजे  किंवा कुठल्या  मोठ्या  पदावरच्या  माणसाने  धुम्रपान करू  नये  अशा  भाबड्या  अपेक्षांचे  काय  करायचे  हा  प्रश्न आहे  . कुठल्याही  नेत्याचे  मूल्यमापन  करण्याचे  निकष  काय  असावेत ? वैयक्तिक  चारित्र्य  का  तो  /ती  त्याचे  काम  किती  कुशलतेने  करतो  हा ? देश  अस्थिरतेच्या  गर्तेत  असताना  देशाला  एक  स्थिर  सरकार
देणे  असो  वा  अर्थव्यवस्था  वाढीचा  वेग  वाढवणे  ; वाजपेयी  यांचे  हे  कर्तुत्व  ते  एका  महिलेसोबत  राहतात  यामुळे  कमी  होईल  असे  तत्कालीन  भाजप  नेतृत्वाला  का  वाटले असावे ? देशात  लोकशाही  रुजवणे , अनेक  मुलभूत  बदल  घडवणे  आणि  स्वातंत्र्य  लढ्यातल  कर्तुत्व  हे  नेहरूंचे  'तसले ' फोटो  टाकल्याने  झाकोळून  जाइल  हा  आत्मविश्वास  त्यांच्या  विरोधकांमध्ये  कसा  येतो .

बिल  क्लिंटन  यांच्या  अमेरिकेच्या  राष्ट्राध्यक्ष  च्या  पहिल्या  टर्म  मध्ये  मोनिका  लेविन्स्की  प्रकरण  उघड  झाले  आणि  मोठा  गहजब  उडाला . पण  अमेरिकन  जनतेने  दुसऱ्यांदा  पुन्हा  बिल यांना  निवडून  दिले  कारण  त्यांनी  त्यांच्या  कारकिर्दीत  अनेक  लोकोपयोगी  निर्णय  घेतले , अर्थव्यवस्थेची  गाडी  रुळावर आणली  आणि  आंतरराष्ट्रीय  स्तरावर  अमेरिकेचा  दबदबा  पुन्हा  प्रस्थापित  केला . अमेरिकन  जनतेने  त्यांच्या  देश  चालवण्याच्या  कौशल्याला  दिलेली  हि  दादच  होती . त्यासाठी  त्यांनी  क्लिंटन  यांच्या  वैयक्तिक  आयुष्यातल्या  त्या  'प्रकरणाकडे ' कानाडोळा'  केला .  दुटप्पी  पणाची  मोठी  परंपरा  असलेल्या  आपल्या  देशात  असे  होईल ?

भारतीय  नेते  पण  आपली  'Holier  than  cow ' अशी  प्रतिमा  बनावी  यासाठी  धडपडत  करत  असतात . आपण  धुम्रपान  /मद्यपान / सुंदर  स्त्रियां सोबतचे  छायाचित्र  प्रसिद्ध  होऊ  नये  यासाठी  त्यांची धडपड  चालू  असते . बाळासाहेब  ठाकरे  यांच्यासारखा  एखादा  दिलदार  नेता  त्याला  अपवाद . आपले  हेनिकेन  बीअर  चे  प्रेम  बाळासाहेब  यांनी  कधी  लपवले  नाही . त्याना  सतत  ओढायला  पाईप  लागायचा . तुमच्या  आवडी  निवडी  बद्दल  तुम्ही  unapologetic  असाल  तर  तुमचे  अनुयायी  पण  तुम्हाला  स्वीकारतात  ह्याचे  बाळासाहेब  ठाकरे  हे  उदाहरण . पण  बहुतांश  नेते  लोकापवादाला  घाबरून  राहण्यातच  धन्यता  मानतात .

राजकारणी  आणि  त्यांच्या  आयुष्यात  येणार्या  स्त्रिया  हा  विषय  राजकीय  वर्तुळात  आणि  सर्वसामान्य  लोकांमध्ये  चवीने  चघळला  जाणारा  विषय . नेहरू  आणि  लेडी  Mountbatten हे  याचे  उदाहरण . त्यांच्यामध्ये  कशा  प्रकारचे  संबध  होते  याची  चर्चा  आपण  चवीने  करणे  हे  त्यांच्या  वैयक्तिक  आयुष्यावर  आपण  करत  असलेले  आक्रमण  नाही  का ? सध्या  मोदींच्या  वैयक्तिक  आयुष्याची  चर्चा  चालू  आहे . त्यांनी   सोडलेल्या  त्यांच्या  बायकोपासून  ते  'पाठलाग ' करत  असणारया  स्त्रीपर्यंत  अनेक  विषयावर  चवीने  चर्वित  चर्वण  चालू  आहे . हे  सगळे  जरी  खरे  आहे  असे मानले   तरी  'पंतप्रधान ' मोदी  यांचे  मूल्यमापन  करण्याचा  हा  निकष  असू  शकतो  का ? त्यांचे  मूल्यमापन  करण्याचा  निकष  त्यांनी   महागाई  कशी  नियंत्रित  केली , परराष्ट्र  धोरण  कसे  राबवले , भ्रष्टाचार  कसा  नियंत्रित  केला  हा  असायला  नको  का ? नेत्यांची  वैयक्तिक  आयुष्य  आणि  राजकीय  आयुष्य  यांच्यात  फरक  केला  पाहिजे असे  माझे  मत  आहे .  (एन . डी . तिवारी  सारख्या  नेत्याला अपवाद  ठेवावे  काय ?)
 अर्थातच  हे  अवघड  आहे .   लोकांना  मोठ्या  लोकांबद्दल  आणि एकूणच  gossiping  करायला  आणि  ऐकायला  आवडत . पण  जेंव्हा  नेता  निवडीची  वेळ  येते तेंव्हा  कुठल्या  निकषांना  जास्त  महत्व  देणे  गरजेचे आहे हे  लोकांनी  ठरवायचे  आहे . राजकारणी  हि  कितीही  तिरस्करणीय  जमात  बनली  असली  तरी  त्याना  एवढा  favor  भारतीय  जनते  ने  करावा .

(लेखात  थोडा  preaching  चा  टोन  आला  असल्यास  क्षमस्व )


No comments:

Post a Comment