Tuesday, 2 December 2014

द सिक्रेट- नवीन अंधश्रद्धा ?

अंधश्रद्धा  या  सर्व  समाजांमध्ये  कमी  अधिक  प्रमाणात  आढळतात . म्हणजे  भारत हा  साप -हत्ती  चा आणि मागासलेला  देश  आहे  असे  मानणाऱ्या  युरोपिअन  देशांमध्ये  आणि  अमेरिकेमध्ये  पण  अंधश्रद्धा  भरभरून  आढळतात .   भारतात  भानामती  आणि  अंगात  येणे  वैगेरे  प्रकार  होत  असतील  तर  गोऱ्या  लोकांमध्ये  उडत्या  तबकड्या , परग्रहवासी  आणि  dooms  day  वैगेरे  विज्ञानाचा  मुलांमा  दिलेल्या  अंधश्रद्धा  जोरात  आहेत . याचा  एक  दणकून  पुरावा  म्हणजे  २१ नोव्हे . २०१२  च्या  निमित्ताने  उडालेला  धुरळा . जग  आता  नष्ट  होणार  म्हणून  अनेक  लोकांची  पळापळ  सुरु  झाली  होती . शेवटी  नासा  ला  मध्ये  पडून  हे  धादांत  खोटे  आहे  असे  निवेदन  द्यावे  लागले  होते . तरी  पण  तो  दिवस  उलटे  पर्यंत  अनेक  लोकांनी  आपले  'जिझस ' पाण्यात  बुडवून  ठेवले  होते . तर  सांगायचा  मुद्दा  हा  कि  खरच  अंधश्रद्धा या  बाबतीत  खरच  'काळ -गोर ' (No  pun  intended ) करता  येत  नाही .

मला  'द  सिक्रेट ' या  प्रकरणाचा  शोध  'चित्रलेखा ' मासिक  वाचताना  लागला . चित्रलेखाने  चक्क  या  विषयावर कवर  स्टोरी  केली  होती .  काय  आहे  हे  प्रकरण ?  Rhonda Byrne  या  लेखिकेने  हे  पुस्तक लिहिले  आहे . याच  विषयावर  एक  फिल्म  पण  आहे . तू नळी  वर  तिचा  काही  भाग  उपलब्ध  आहे . तर  या  पुस्तकात  Rhonda ने  एक  नियम  मांडला . 'The  Law  of  Attraction ' (आकर्षणाचा  नियम ?). Rhonda च्या  मते  हा  नियम  फ़क़्त  काही  ठराविक  लोकांनाच  माहित  होता . यात  मोठमोठे  महाराजे , कलाकार , सेनानी  आणि  मानवी  इतिहासाला  वळण  देणार्या  व्यक्तींचा  समावेश  होता . पण  Rhonda च्या  मते  हा  मानवी  जीवनाला  वेगळे  वळण  देणारा  आणि  मानवाच्या सगळ्या  आशा  आंकाक्षा  पूर्ण  करणारा  नियम  तिला  सर्वसामान्य  लोकांपर्यंत  पोहोचवायचा  आहे  म्हणून  तिने  हे  पुस्तक  लिहिले  होते . हा The  Law  of  Attraction 'असे  सांगतो  कि माणूस  हा  सकारात्मक  विचारांच्या  मदतीने  आपल्याला  पाहिजे  ते  म्हणजे  भरपूर  संपत्ती , प्रेम , सुदृढ तब्येत  वैगेरे  मिळवू  शकतो . वर  वर  तर  हे  विधान /नियम निरुपद्रवी  आणि  खर  वाटू  शकत . पण  ग्यानबाची  मेख  अशी  आहे  कि  या  नियमाला  पूर्ण  पुस्तकात  वैज्ञानिक  नियमांचं  अधिष्ठान  देण्याचा  जोरदार  प्रयत्न  केला  आहे . त्यासाठी  Placebo  Effect  च्या  मागचे  कार्यकारण  भाव  आणि  Quantum Physics चे  नियम  याचे  दाखले  देण्यात  आले  आहेत .   म्हणजे  एका  साध्या  नियमाला  तो  एक  त्रिकालाबाधित  नियम  आहे  असे  सिद्ध  करण्याचा  खटाटोप .  म्हणजे  या  पुस्तकात  वजन  कसे  कमी  करावे  किंवा  घातक रोगांपासून  The  Law  of  Attraction ' वापरून मुक्ती  कशी  मिळवावी  यावर  वेगळे  प्रकरण  आहे . त्यावर  अनेक  तज्ञांनी  टीका  केली . म्हणजे  सकारात्मक  विचार  करणे  हि  चांगली  गोष्ट आहे  पण  दुर्धर  रोगाच्या  शेवटच्या  टप्प्यात  असणारा  माणूस  The  Law  of  Attraction ' वापरून  बरा  होऊ  शकतो  का ? अनेक  वैज्ञानिक आणि  Medical  Experts  नी  हे  पुस्तक  रुग्णांना  आणि  त्यांच्या  नातेवाईक  याना  खोटी  आशा  लावते  अशी  टीका  केली  आहे .

साहजिकच  या  पुस्तकावर  आणि  The  Law  of  Attraction ' वर  टीकेची  राळ  उडाली .  अनेक  लोकांनी  यावर  टीका  केली  आहे  कि  या  नियमावर  विसंबून  राहणारे  आणि  प्रत्येक  समस्येवर  'Instant  Solution ' शोधू पाहणारे  लोक  आपल्या  आयुष्यातील  समस्येच्या  root  cause  पर्यंत  जाण्याच  टाळतात  आणि  हे  त्यांच्यासाठी  धोकादायक  आहे .आता  या  पुस्तकातल्या  Quantum Physics  च्या  दाखल्या  बद्दल  Rhonda Byrne ने  विज्ञान  या  विषयाचा  कधी  अभ्यास  पण  केला  नव्हता . तरी  पण  तिच्या  दाव्यानुसार  The  Law  of  Attraction '  वापरून  अतिशय  क्लिष्ट  अशा  Quantum Physics चे  नियम   समजून  घेतले . तिच्या  या  दाव्यावर  सडकून  टीका  होणारच  होती  आणि  तशी  ती  झाली  देखील .

शिवाय  आपल्यासोबत  घडणारया  सर्व  वाईट घटना  आपणच  नकारात्मक  विचार  करून आपल्याकडे  आकर्षित  करून  घेतो हा  The  Law  of  Attraction चा  व्यत्यास  पण  तितकाच  धोकादायक . म्हणजे  दिल्ली  बलात्कार  प्रकरणातील  बलात्कारित  मुलीने  नकारात्मक  विचार  करून  तो  बलात्कार  ओढवून  घेतला  होता  का ? किंवा  लातूर  मध्ये  झालेल्या  भूकंपात  मरण  पावलेल्या  किंवा  सर्वस्व  गमावलेल्या  लोकांनी  हा  भूकंप  नकारात्मक  विचार  करून  घडवून  आणला  होता  का ?  साहजिकच  victim  असणाऱ्याला  दोषीच्या  पिंजर्यात  हा  नियम  उभा करतो .

पाश्चात्य  लोकांकडून  आलेलं  सगळ  भारी  अस  मानून  चालणार्या  आपल्याकडे  पण  या पुस्तकाचा  खप चिक्कार  वाढला  आहे . माझे  काही  मित्र  पण  यात  आले . ते  कायम  आम्ही  सध्या  किती  आनंदी  आहोत  आणि  सकारात्मक  आहोत  हे  दाखवत  असतात  आणि  कुठलाही  प्रश्न  शेयर  करायला  गेल  कि  Think  Positive ' चा  डोक्यात  जाणारा  सल्ला  देतात . इतकेच  नाही  तर  आम्ही  द  सिक्रेट  वाचल  आहे  हे  status  of  symbol  समजणाऱ्या लोकांचा  संप्रदाय  आपल्याकडे  पण  मोठ्या  प्रमाणावर  वाढला  आहे . अनेक  बापू -महाराज -साध्वी  यांचे संप्रदाय  कमी  होते  कि  काय   म्हणून  यात  या  नवीन  cult  ची  भर . आता  तर  The  Law  of  Attraction चे  दाखले  अनेक  महाराज  लोक  पण  आपल्या  प्रवचनात  द्यायला  लागले  आहेत . हा  नियम  वापरून  प्रबोधन  करणार्या  Motivational  Speakers चे  तांडे  पण  तैयार  झाले  आहेत . हो  आणि  ते  Speakers  आपल्या  प्रबोधनासाठी  भरभक्कम  फी  आकारतात . The  Law  of  Attraction वापरून  पैसे
कमवत  नाहीत . यालाच  विरोधाभास  म्हणतात  कि  काय ?


No comments:

Post a Comment