Monday, 26 January 2015

हॉस्टेल लाईफ आणि नवरस

हॉस्टेल  ला  राहाण  हा  एक  श्रीमंत  करणारा  अनुभव  असतो . हॉस्टेल  लाईफ  बद्दल  एकदम  वाईट  अनुभव  असणारे  लोक  आणि  एकदम  भन्नाट  अनुभव  असणारे  लोक  असे  दोन  गट . अधल  मधल  काहीच  नाही . सुदैवाने  मी  दुसर्या गटात  मोडतो .  खालचे  अनुभव  माझे  असले  तरी  थोड्या  फार  फरकाने  हॉस्टेल  मध्ये  राहिलेल्या  प्रत्येकाचेच .


हास्य  रस -   माझ  इंग्रजी  तेंव्हा  यथातथाच  होत . छोट्या  शहरामधून  आल्यामुळे  mannerism  चा  पत्ता  नव्हता . सकाळी  शिक्षकांना  आल्या  आल्या  good  morning म्हणायचे  असते  हे  नुकतेच  कळले  होते . एकदा  रात्री  रस्त्यावर  फिरताना  रेक्टर  सर  भेटले . त्याना  बघितल्या  बघितल्या  मी  'Good  Night  Sir ' म्हणून  मोकळा  झालो . सरांनी  दुसऱ्या  दिवशी  केबिन  मध्ये  बोलावून  दंड  ठोठावला . 'प्रश्न  पैशांचा  नाही . पण  Good  Night  हे  निरोप  देताना   म्हणायचे  असते   हे  तुझ्या  मठ्ठ  डोक्यात शिरले  पाहिजे . "  सरांनी  दंड  का  या  माझ्या  प्रश्नाला  उत्तर  देताना सांगितले .  गरवारे  कॉलेज  हॉस्टेल  नदी  काठी  आहे . अकोल्याच्या   सुमित  केडिया ने  हि  नदी  गंगा  नदी  आहे  असे  सांगत  आमच्याशी  तासभर  वाद  घातला  होता . नवीन  पोरांचा  'इंट्रो ' घ्यायला  रुबाबात  आम्ही  निघालो  आणि  त्या  मोकार  ज्युनियर  पोरांनी  आमचाच  इंट्रो  घेतला  होता . आज  ती  पोर  मित्र  बनली  आहेत  पण  अजूनही  तो  इंट्रो  चा  प्रसंग  आठवला  की  हसू  येत .

बीभत्स  रस -  हॉस्टेल  लाइफ़  मध्ये  मोठ्या  प्रमाणात  आढळणारा  रस . आमच्या  हॉस्टेल  ची  मेस लावणे सगळ्यांना   सक्तीचे  होते . त्यामुळे  झक  मारून  तिथच  जाव  लागायचं . मेस   चा  मालक  भाऊ  च  एक  लाडक  मांजर  होत . त्याला  हाड हुड  कुणी  केलेलं  पण  भाऊ  ला  खपायच  नाही . त्यामुळ  ते  मांजर  कुठेही  फिरायचं  आणि  पडायचं . एकदा  त्याला  मी  आणि  माझ्या  मित्राने  कोबी  च्या  गड्ड्यावर  प्रतीर्विधी  उरकताना  बघितलं  होत . त्याच  दिवशी पानात  कोबी  ची  भाजी  आली . मी  आणि  मित्र  सटकलो काहीतरी  कारण  सांगून . आणि  बाकीच्यांचं  जेवण  झाल्यावर  आम्ही  हे  गुपित  फोडलं . त्यांची  प्रतिक्रिया  काय  होती  हे  इथे  सांगू  शकत  नाही . आमच्या  रूम  च्या  अस्वच्छतेच्या  तर  दंतकथा  पसरल्या  होत्या . रूम  ला  महिनो  ना महिने  झाडू  लागत  नसे . रूम  मध्ये  एवढा  कचरा  होता  की  त्यात  एक  छोटी  बादली  हरवली  होती . ती  होस्टेल  सोडताना  सापडली . त्या  कचरा  आणि  दुर्गंधी  युक्त  रूम  मध्ये  आम्ही  तिघ  जण  लोळत  पडलेलं  असू . एकदा  माझ्या  रूम  पार्टनर  ने  ३ आठवडे  कपडे  सर्फ  मध्ये  बुडवून  ठेवले  होते . आमच्या  संवेदना  मेल्या  होत्या  पण  त्याच  वेळेस  मला  भेटायला  चुलत  भाऊ  आला  होता . तो  अजूनही  सांगतो  की  त्यावेळेस  जो  वास  सर्वत्र  पसरला  होता  तो  जगताला  सगळ्यात  किळसवाणा  वास होता  .  आणि  तो  केमिकल  अभियंता  आहे .


अदभुत रस -  अदभुत  म्हणजे  आश्चर्य  आणि  उत्सुकता . घरात  अनेक  वर्ष  एक  सुरक्षित  आयुष्य  काढून  हॉस्टेल  ला  आल्यावर  पोहोता न  येणाऱ्या  माणसाला  एखाद्या  खोल  विहिरीत  ढकलून जस  वाटत  तस  वाटत . हॉस्टेल  हे  जंगला  सारख  असत .  survival  spirit  उच्च  ठेवून  राहावं  लागत . एकदा  आपल्या  समानधर्मी  मित्रांचा  कळप  जमला  कि  हे  होतकरू  नवोदित  विद्यार्थी  हे  सुंदर  जंगल  explore  करायला  लागतो . तोंडात  लोणच्याची  फोड  ठेवायला  लागल्यावर  तोंडात  वेगवेगळ्या  चवींचे  हवेहवेसे  स्फोट  होतात  तस  हॉस्टेल  मधला  प्रत्येक  नवा  दिवस  काहीतरी  नवीन  देऊन  जातो . हॉस्टेल  च्या  जगात  एकट्यानेच  एन्ट्री  केली  तरी  जाताना  माणूस  कधीच  एकटा  बाहेर  जात  नाही . सोबत असतात  ते  जीवाला  जीव लावणारे  अनेक  मित्र .   पाकिस्तान  कसा  नष्ट  करता  येईल , रूम  मधल्या  ढेकणा  चा  बंदोबस्त  कसा  करावा , भारत  नेहमी  विदेशी  भूमी  वर  सामने  का  हरतो , पोरी  कशा  फिर्वाव्यात अशा  अनेक  विषयावर रात्र  रात्र झालेल्या  चर्चा , महाराष्ट्र  आणि  देशातल्या  विविध  भागातून  आलेले  मित्र , त्यातून  झालेली  वेगवेगळ्या  संस्कृतींची  ओळख  , आणि  जगाचे  झालेलं  नवीन  आकलन . हॉस्टेल  मधून  बाहेर  पडणारा  माणूस  अंतर्बाह्य  बदलून  बाहेर  पडतो . 

क्रौर्य  रस - होस्टेल हि  एक  खूप  क्रूर  गोष्ट  पण  आहे . अर्धेंदू  नावाचा  एक  अर्धवट  डोक्याचा  पोरगा  होता . त्याला  वागण्या  बोलण्याचा  फारसा  पोच  नव्हता . इतर  पोर  त्याला  छळ  छळ  छळायची . एकदा  एका  मुली  ने  तुला  कार्ड  दिल  आहे  आणि  तुला  भेटायला  बोलावलं  आहे अस  सांगून  आपणच  एक  कार्ड  त्याच्या  हातात  कोंबल . त्या  येड्याला  पण  ते  खर वाटलं . आणि  त्या  पोरी  समोर  जाऊन  काही  तरी  बोलल . पोरीन  त्याला  थोबडावला . बिचारा  अर्धेंदू  होस्टेल सोडून  गेला . हॉस्टेल  ला  काही  पूर्वोत्तर  राज्यातून  आलेली  काही  मुल  होती . दिसायला  एकदम  वेगळी  आणि  भाषेचा  प्रश्न . ग्रामीण  भागातून  आलेली  इरसाल  पोर  त्याची  जाम  मजा  घ्यायची . पण  ते  कधी  कधी  खूप  अति  करत . आपण  किती  रेशियल  लोक  आहोत  हे  तेंव्हा  मला  कळल . नंतर  ती  पुर्वोतर  राज्यातली  पोर  एकजात  सगळी  लष्करात  गेली . पण  देशाचा  उर्वरित  भाग  आपल्याला  'आपल ' समजत  नाही  हे  फिलिंग  त्यांच्या  डोक्यातून  गेल  असेल का  कधी ? 

भय  रस आणि  रौद्र  रस -  आमच्या  हॉस्टेल  ला  रोज  सकाळी  ६ ते ६. ३०  पीटी  सक्तीची  होती . आम्ही  एखादा  बकरा  पकडून  त्याला  रूम  ला  बाहेरून  कडी  लावून  घे  आणि  जा असे  सांगून  स्वतः  मध्ये  लोळत  पडत  असू . नंतर  नंतर  आजूबाजूच्या  रूम  मधले  पोर  पण  सकाळी तिथे  येउन  पडायला  लागले . रेक्टर  सरांना  याची  कुणकुण  लागली . एका  दिवशी  आम्ही  असच  बाहेरून  कडी  एकाला  लावायला  सांगितली  आणि  लोळत  पडलो  होतो  आणि  सर  धाडकन  दरवाजा  उघडून  मध्ये  आले . आणि  जमेल  तसे  हात  पाय  चालवायला  सुरु  केले . तो  प्रसाद  ग्रहण  करत  आम्ही  धडपडत  बाहेर  आलो . नंतर  २ आठवडे  आम्हाला  कॉलेज  च्या  मोठ्या  मैदाना  ला  १५ चकरा  मारण्याची शिक्षा  मिळाली .

शृंगार  रस -  बीभत्स  रस  हा  सर्वाधिक  आढळणारा  रस  असेल  तर  शृंगार  रस हा  सर्वाधिक  अभाव  असणारा  रस . अर्थात  काही  मोजक्या वीरांचा  अपवाद  वगळून . जो  काही  शृंगार  रस  असतो तो  एकाच  format मध्ये . ईथे  जे  हॉस्टेल  मध्ये  राहिलेले  आहेत त्या  लोकांना  तो  न  सांगताच  कळेल .


वीर  रस - हॉस्टेल  तुम्हाला  शूर  बनवत . घरून  आलेला  खाऊ  इतरांपासून  लपवून  एकट्याने  खाणे , एखाद्या  खोडकर  अंग्काठीने  मोठ्या  पोराला  अंगावर  घेणे , बंदी  असताना  रात्र  भर  पत्त्याचा  डाव  रंगवणे , खिशात  शेवटचे  ५० रुपये  असताना  महिन्याचे  १५ दिवस  काढणे , हॉस्टेल  चे  गेट  ९. ३० ला  बंद  होत  असते  तरी  पण  रात्री  पिक्चर  बघायला  जायचं  आणि  एका  अवघड  खांबाचा  आधार  घेऊन  चढून  जाण  एक  ना  दोन  प्रकार . खूप  भितींवर  मात  करायला  हॉस्टेल  शिकवत .शांत  रस -  हॉस्टेल  सोडण्याचा  दिवस . सगळीकडे  एक  विचित्र  ओक्वर्ड  शांतता . सगळीकडे  सामानाची  बांधाबांध  चालू . बाहेर  निरव  शांतता  पण  डोक्यात  कल्लोळ . हे  हरामखोर  मित्र  पुन्हा कधी   भेटतील ? बाहेरच  जग  हॉस्टेल  सारखच मजेशीर  आणि  भन्नाट  असेल  का ? आता  कुठ  राहायचं ?दुसऱ्या  मेस  चा  मालक  आपल्या  मेस  मालक  भाऊ  सारख  बाहेर  जेवायला  जाताना  पैसे  उधार  देईल  का ? बिपीन  आणि प्रभाकर  सारख  फास्ट  फुड  दुकान  दुसरीकडे  असतील  का ? हॉस्टेल  च्या  खिडकीत  बसून  पडणारा  पाऊस  आणि  नदीच  वाढत  जाणार  पाणी  तासंतास  बघायला  कसली  मजा  येते आता  ती गेलीच  का  ?  आपले  ऋणानुबंध  फ़क़्त  या  हरामी  मित्रांसोबत  च  नव्हते  तर  या  भव्य  इमारती  शी  पण  होते हे  शेवटच्या  दिवशी  कळत . 
No comments:

Post a Comment